मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज राज्यात दोन मोठ्या घटना घडल्या. सकाळी औरंगाबादजवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांचा नाहक बळी गेला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या घटनेने मनातून व्यथित झालो असून राज्यसरकार तुमच्या सोबत आहे . अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार; जीव धोक्यात घालून प्रवास करु नका
दरम्यान, मुंबईमध्ये लष्कर येणार हि अफवा काही दिवसांपासून पसरली होती यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई मध्ये लष्कर कशाला पाहिजे ? तुम्हाला विश्वासात घेऊनच सगळ करणार, या लढाईत आपण सगळे जवान आहेत. अस उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर पुढे येणारा पावसाळा आणि पोलिसांवर येणारा ताण पाहता केंद्र सरकार कडे अधिक मनुष्यबळाची मागणी करू शकतो. हा पर्याय देखील मुख्यमंत्र्यांनी ओपन ठेवला आहे. तर पोलीस सुधा माणूस आहे तो थकत आहे. तेव्हा अधिकच मनुष्यबळ लागल तर केंद्र सरकारकडे मागणी करणार आहोत. अस उद्धव ठाकरे म्हणाले आहे. त्याचबरोबर हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे माझा प्रत्येक नागरिक हा जवान आहे. तेव्हा लष्कराची राज्यात गरज नाही अस देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
‘लॉकडाऊन’मध्ये गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं लग्न; ‘या’ अभिनेत्यासोबत अडकणार लग्नाच्या बेडीत
दरम्यान, दुसरीकडे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. तसेच, लॉकडाऊनचा तिसरा कालावधी 17 मे रोजी संपतो आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिक घरात नाही बसले तर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा तुम्ही शिस्त पाळाल तेव्हाच लवकर लॉकडाऊन संपेल अस ठाकरे म्हणाले आहेत.
मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा द्या; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
