Share

‘लॉकडाऊन’मध्ये गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं लग्न; ‘या’ अभिनेत्यासोबत अडकणार लग्नाच्या बेडीत

Published On: 

मुंबई : गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (८ मे) लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत.

२९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे.

तसेच या विवाहसोहळ्याला साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असेल. तसेच लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

दरम्यान, गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील. योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल अशीही माहिती अक्षयने दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!