Share

मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा द्या; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो

Published On: 

मुंबई : लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी विविध राज्यांमधून ट्रेन सोडण्यात येत आहेत. पण त्यासाठी ट्रेन प्रवासाचे तिकिट शुल्क आकारले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुखने एक मन सुन्न करणारा फोटो ट्विटवर शेअर करत मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. याविषयी ट्विट करत त्याने मन हेलावून टाकणारा एक फोटो त्याने शेअर केला आहे. आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेऊन एक मजूर पायी प्रवास करत असल्याचा हा फोटो आहे.

‘देशातील स्थलांतरीत लोकांचा घरी परत जाण्याचा खर्च आपण उचललाच पाहिजे. रेल्वे सेवा मोफत दिली पाहिजे. आधीच हे मजूर पगाराविना आहेत, त्यात त्यांना राहण्यासाठी घर नाही आणि करोना व्हायरसची लागण होण्याचा धोकासुद्धा अधिक आहे’, असं रितेशने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, कोरोनामुळे गरिबांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करुन रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!