टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे असं वृत्त ANI या वृत्त विषयक संस्थेने दिलं आहे. ANI ला त्यांच्या सूत्रांनी ही बातमी दिली आहे असं ते म्हटले आहेत.
ANI ने ट्वीटरवर ही माहिती दिली आहे त्यात म्हटलंय, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना त्यांच्या नियुक्तीच्या मुद्य्यावर फोन केला. त्यांनी मदत मागितली, ते म्हणाले की जर तसे झाले नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पंतप्रधान म्हणाले की ते या प्रकरणात लक्ष घालतील आणि अधिक माहिती घेतील : सूत्रांनी एएनआयला सांगितले
Maharashtra CM Uddhav Thackeray called PM about his nomination. He asked for help, saying if it doesn’t happen he will have to resign. PM said he will look at the matter and get more details: Sources tell ANI (File pics) pic.twitter.com/GPUgx62CG8
— ANI (@ANI) April 29, 2020
आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांनाच फोन केल्याने तरी राज्यातील पेच मिटेल अशी चिन्ह आहेत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

