Share

संकट काळातही लोकांचा छळ करणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही- कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

पणजी – या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेली लक्षणीय वाढ चांगल्याच चर्चेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसने भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे. कोविड संकट काळात वीज, पेट्रोल व डिजेलचे दर भाजप सरकारने वाढवुन कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्यांचे कंबरडे मोडले असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपवर शरसंधान केले आहे. मागील सात दिवसांत गोव्यात पेट्रोल व डिजलचे दर सतत वाढत आहे. एका आठवड्यात हे दर तब्बल अडिच ते तीन रुपये वाढले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी होत असताना, भाजप सरकार इंधनाचे दर वाढवत असुन, भाजपने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला.

एका बाजुने जनतेच्या पैशांची भाजप सरकार लूट करत आहे परंतु गरजवंताना मदत मिळत नाही. हा पैसा कुठे जातो हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतानी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, संकट काळातही लोकांचा छळ करणाऱ्या भाजप सरकारला जनता कदापी माफ करणार नाही. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे व राज्यातील सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आज राज्यात आर्थिक आणिबाणी आली असून, गोवा राज्याला भाजपने दिवाळखोर केले आहे, असा आरोप देखील चोडणकर यांनी केला.

पहा, असं का म्हणाला सोनू सूद? ‘Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो’  

हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे; जितेंद्र आव्हाड माध्यमांवर भडकले

महिलांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!