Share

‘ATKT च्या तब्बल 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘हेराफेरी’ होण्याची शक्यता’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई– राज्य सरकार विविध मुद्द्यांवर निर्णय घेताना गोधळलेले असल्याची टीका नेहमीच केली जात असते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच खिंडीत पकडलं होतं. आता पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारला शालजोडीतून लगावले आहेत.

“राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो म्हणाले – हेराफेरी, मजुरांना अन्नपाणी देतो म्हणाले – फिर हेराफेरी, मदतीचे पॅकेज देतो म्हणाले – हेराफेरी पार्ट २, पदवी परिक्षा रद्द करतो म्हणाले…?, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय घेतो म्हणाले…? बाबुभैया? ये क्या चल रहा है?,” असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

“महाविकास आघाडी… बाबुभैया, हेराफेरी तो है! राज्य सरकारची दानत तर दिसत नाही. बाबुभैया, सरकारची नियतही साफ वाटत नाही. एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘हेराफेरी’ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिक्षणाची सरकारला ‘हेराफेरी’ करु द्यायचे नाही,” असेही ते म्हणाले.

नागपूर पोलिसांनी मास्क जागृतीसाठी घेतली जेठालालची मदत; भन्नाट ट्विट करत म्हणतात…

बीडमध्ये झाले खाकी वर्दीतील देव माणसांचे दर्शन…

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!