Share

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी : रामदास आठवले

Published On: 

मुंबई दि. 30 – कोरोना सारख्या संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षासह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. कोरोनाशी लढा देण्यासाठी विरोधी पक्ष सरकार सोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले काम करीत आहेत. मात्र राज्यावर एखादे मोठे संकट आले तर राज्यातील विरोधी पक्ष आणि सर्व पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यानुसार कोरोनाच्या महासंकटाचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत.

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप चे राज्य अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आणि माझा रिपब्लिकन पक्ष आम्ही सर्व एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सोबत आहोत . त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक लवकर आयोजित करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!