Share

चंद्रबाबू ‘आऊट’ तर आंध्रामध्ये सीबीआय ‘कमिंग’, जगनमोहन सरकारचा मोठा निर्णय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर कॉंग्रेसने चंद्रबाबू नायडू यांना विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिला आहे, मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या जगनमोहन रेड्डी यांनी शपथविधी होताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने 3 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारला सीबीआय तपासासाठी राज्याकडून मिळणारी मंजुरी मागे घेतली होती, त्यामुळे केंद्र आणि राज्यात काहीकाळ संघर्ष देखील पहायला मिळाला. मात्र आता जगनमोहन यांनी सीबीआयच्या प्रवेशाचे प्रतिबंध मागे घेतले आहेत, त्यामुळे एका बाजूला सीबीआयला राज्यामध्ये कारवाई करण्याचे अधिकार मिळणार असून चंद्रबाबू सरकारमधील माजी मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी गृहमंत्रालयाला यासंबंधी निर्देश दिले असून राज्यात सीबीआयच्या प्रवेशाचे प्रतिबंध मागे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे चोरांची सुटका होणार नाही, असं वायएसआर कॉंग्रेसच्या नेत्याने सांगितले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!