Share

…तथ्य आढळलं तर पंकजा मुंडेंची चौकशी करु : मुख्यमंत्री

Published On: 

नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप सॅनिटरी नॅपकिन खरेदीबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मात्र हे सर्व आरोप पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावले होते.आता ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या बचत गट आणि सॅनिटरी नॅपकीन खरेदीच्या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर चौकशी करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिलेलं स्पष्टीकरण 

शासनाला एकही पैसा यात द्यावा लागणार नाही, एखाद्या व्यक्तीला फायदा व्हावा म्हणून हे केलेलं नाही, हा आरोप अन्यायकारक असून महिला बचतगटांना फायदा व्हावा, तसंच ग्रामीण भागातल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स कमी किंमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून नियमात राहून याबाबत निविदा काढण्यात आल्या. महिला बचत गट या नॅपकिन्सची खरेदी करून विक्री करतील, यात सरकारचा पैसा गुंतलेला नाही .महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सबाबत कोणी राजकारण करत असेल तर त्याला काय म्हणावं?, उलट अशा योजनेबद्दल सरकारचं कौतुक केलं पाहिजे, टिशू पेपर पासून नॅपकिन्स बनवणं आता आउटडेटेड झालंय. यात कोणताही भ्रष्टाचार आणि कोणालाही झुकतं माप देण्याचा प्रयत्न झालेला नाही,. अस्मिता ब्रँड सुरू करणार असून या ब्रँड च्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करून वेगवेगळ्या वस्तू ग्रामीण भागात स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे महिला बचत गटांनाही फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!