Share

गोरक्षणाचे काम व्यवस्थित न केल्यामुळे आता सत्तास्थापनेत अडचणी – मिलिंद एकबोटे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे गोरक्षणाचे काम व्यवस्थित न केल्यामुळे आता सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. असे वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी केले. राजकारण्यांनी गोमातेचे रक्षण केले तर त्यांचे राजकारण व्यवस्थित चालेल, असेही ते यावेळी म्हणाले. पुण्यात रावसाहेब दानवे यांच्या गोहात्येसंदर्भात केलेय वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून झाशीच्या राणी चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना एकबोटे म्हणाले, दानवे यांनी जालना येथील एका मेळाव्यात गोहत्येचे समर्थन करणारे विधान केल. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला. झाशीच्या राणी चौकात दानवेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांनी दानवेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घातला. तर गोहत्येचे समर्थन करणाऱ्या ‘रावसाहेब दानवेचा धिक्कार असो रावसाहेब मिया कसाई चोर है अशा मजकुराचे फलक त्यांनी हातात धरले होते.

एकबोटे म्हणाले, ज्यांना गोमातेचा मान राखता येत नाही, ज्यांना धर्माशी देणंघेणं नाही त्यांनी राजकारण करण्याची गरज नाही. गोरक्षक त्यांच्यावर बहिष्कार टाकतील. गोरक्षकांवर मॉब लीचींग चा आरोप केला जातो. मात्र ही एकतर्फी लबाडी आहे. ही कसायाची उलटी बोंब आहे. गोरक्षण करताना आतापर्यंत पाच वेळा कासायांनी माझ्यावर हल्ला केला आहे. परंतु कासायांनी केलेल्या मॉब लीचींग वर कोणीही बोलत नाही.

पण गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. गायीच्या दुधामुळे लहान मुलांची हाडे मजबू होतात. शेणामुळे त्वचारोग बारा होतो. शेणाचा साबण वापरल्यास त्वचा निरोगी राहते. आपले व्यक्तिमत्व तेजस्वी दिसते. हे सगळे फायदे गायीपासून होतात. गाई ही अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम आहे. असे असताना सरकारला आजपर्यंत संपूर्ण देशातगोहत्या बंदी लागू करता आली नाही हि दुर्दैवी बाद असल्याचे एकबोटे यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192447296266371072?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192386950428127232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192389469556490242?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192458983518269446?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!