Share

‘नदी जोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करुन प्रकल्पांना चालना द्या’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पडणाऱ्या वारंवार दुष्काळावर मात करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हा मैलाचा दगड ठरेल असं अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा प्रकल्प मागे पडला होता आता राज्यातल्या नदी जोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करुन या प्रकल्पांना चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आढावा घेतला.

या प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा- पिंजाळ, नारपार, गिरणा, दमणगंगा- वैतरणा -गोदावरी आणि दमणगंगा- एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या योजनांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावं, अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या व्यतिरिक्त विपूल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!