🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे, केंद्रात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता राज्यात पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज मुंबईतील वसंतस्मृती येथे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी हजर राहणार आहेत. या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती तसेच आगामी रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.
शिवसेनेनंही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
