🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह संपूर्ण देशात गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘ गणेश पर्व अत्यंत आनंदाचं पर्व आहे. देशात -विदेशात हा सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण महाराष्ट्रात बाप्पाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रर्थना की सर्वांना राज्यातील आणि देशातील जनतेला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे.
तसेच पुढे बोलताना ‘महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याचा आणी पूर पिढीतांना दिलासा मिळावा यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करतो, असं म्हणत बाप्पांचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही त्यामुळे देशातील जनता सुखी व्हावी हीच प्रार्थना आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
विघ्नहर्त्यांचे आगमन…
वर्षा निवासस्थानी आज सकाळी गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना केली.
Performed Ganesh Pujan at my residence this morning#GaneshChaturthi#GanpatiBappaMorya#गणेश_चतुर्थी pic.twitter.com/gXO4oxqusd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2019
दरम्यान, राज्यातील काही ठिकाणावरील जनता पुरामुळे तर काही ठिकाणी दुष्काळामुळे त्रस्त आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणावर विस्कळीत झालेले आहे. त्यामुळेच राज्यातील जनता सुखी व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे.
- दरवर्षी श्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येते : मोदी
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
- कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करायची : शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

