बुलडाणा :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता विविध कृषी विषयक योजना, विकेल ते पिकेल धोरण यावर शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अधिकाधिक शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी ग्राम पातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे कृषी विभागाच्या यु-ट्यूब चॅनेलवर प्रसारण करण्यात येणार आहे. विकेल ते पिकेल या धोरणाअतंर्गत मुख्यमंत्री कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियानाची सुरूवात करणार आहेत.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामपातळीवरील कृषी विकास कार्यक्रमाची रूपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी व शेतकरी केंद्रीत कृषी विकास यावर आपले विचार मांडणार असून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
विद्यापीठाच्या निर्णयात स्पष्टता नसून फक्त गोंधळ, ऑनलाइन परिक्षा देणार कशी- कमलाकर शेटे
..तर सरकारला जबर किंमत मोजावी लागेल! खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
आरबीआयच्या मोरटोरियम योजनेवर 28 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

