मुंबई : कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आरबीआयकडून ईएमआय पुढे ढकलण्याची म्हणजेच मोरॅटोरियम योजना ऑगस्टमध्ये संपली मात्र हि योजना डिसेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सुप्रीम कोर्ट पुढील सुधावणी २८ सेप्टेंबरला देणार आहे .
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने कोर्टाला सांगितले की, उच्च स्तरावर विचार केला जात आहे. बँका आणि अन्य भागधारकांच्या मदतीसाठी सल्लामसलत करून दोन किंवा तीन फेऱ्या पार पडल्या आहेत केंद्राने दोन आठवडे विचारले होते, त्यावर कोर्टाने विचारले की दोन आठवड्यांत काय होणार आहे? आपल्याला विविध क्षेत्रांसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावे लागतील. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
हे प्रकरण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता या प्रखरणी 28 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. पुढच्या वेळी प्रत्येकाने आपले उत्तर दाखल करावे आणि या प्रकरणात ठोस योजना घेऊन न्यायालयात यावे, असे सुप्रीम कोर्टानं सरकारला बजावले आहे.
महत्वाच्या बातम्या
दुनिया हिला देंगे हम: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते- नुपूर मेहता
राजकारण करा पण ते कोणत्याहि बाजूने सुडाचं नको ; केदार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

