Share

व्यवसाय बंद ठेवणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही, बाजारपेठ सुरु करू द्या ; करमाळ्यातील व्यापाऱ्यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

करमाळा –  येणाऱ्या काळात गणपती महालक्ष्मी दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण असून या काळातच व्यापाऱ्यांना चांगला व्यवसाय होतो अशा काळात व्यवसाय बंद ठेवणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून करमाळा शहरातील सर्व प्रकारची दुकाने कोरोना चे सर्व नियम व अटी पाळून चालू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करमाळा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दिनेश घोलप यांनी केली आहे

या निवेदनाच्या प्रती ई-मेल द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आलेल्या आहेत या निवेदनात पुढे म्हटले आहे की कोरोना च्या काळातील सर्व नियम व अटी चे पालन करमाळ्यातील व्यापाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे करमाळा बाजारपेठ बंद मात्र आजूबाजूच्या परंडा जामखेड टेंभुर्णी भिगवण कर्जत कुर्डूवाडी या गावातील बाजार सुरू आहेत ग्राहक या बाजारपेठेत जाऊन खरेदी करतात याचा फटका ग्राहकांना व व्यापाऱ्यांना बसत आहे.

सध्या करमाळा तालुक्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहेत शहरात तर नगण्य स्वरूपात रुग्ण सापडत आहेत ग्रामीण भागातील चार ते पाच गावात रुग्ण संख्या वाढलेली आहे ही चार पाच गावे बंद ठेवून करमाळा शहरातील व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी केली असून कोरोना संदर्भातील सर्व अटीचे पालन व्यापारी करतील अशी ग्वाही अध्यक्ष दिनेश घोलप यांनी दिली आहे यानिवेदनाची ची प्रत तहसीलदार समीर जी माने यांना दिली आहे निवेदनावर शेकडो व्यापाऱ्यांच्या यांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!