Share

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचा वाद पेटला; अनधिकृत गाळे पाडण्यासाठी महाविकास आघाडीचा महापालिकेत ठिय्या!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे, गाळेवाटप, मोकळ्या जागा वाटप, बेकायदेशिररित्या केलेला दैनंदिन खर्च या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षामध्ये विद्यमान संचालक मंडळाने सुमारे ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे.

असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्‍यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात आले आहे.

बाजार समितीच्या आवारात सत्ताधाऱ्यांनी अवैधरित्या २८ गाळे बांधल्याचा आरोप नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेतर्फे करण्यात आला. हे गाळे तातडीने पाडावेत अशी मागणी करत नगर तालुका महाविकास आघाडीचे बाळासाहेब हराळ व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

आठ दिवसांत त्वरित कार्यवाही न झाल्यास नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा.गाडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब हराळ, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता कावरे, मदन आढाव, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, उपसभापती रविंद्र भापकर, केशवराव बेरड यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!