Share

सिनेसृष्टी ‘गटार’ नाही, सामनाने केले जया बच्चन यांच्या भूमिकेचे समर्थन तर कंगनाला काढला चिमटा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच हंगामा सुरु झाला आहे. हे प्रकरण टोकाला गेले असून अमली पदार्थांशी अनेक कलाकारांचे संबंध देखील समोर येत आहेत. दुसरीकडे कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि व्यवस्थेबद्दल आवाज उठवल्यानंतर शिवसेना आणि कंगनाचा वाद विकोपाला गेला आहे.

सद्या केंद्राचे पावसाळी अधिवेशन सुरु असून हा वाद तिथे देखील रंगलेला पाहायला मिळाला. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशनने बॉलिवूडवर टीका केल्यानंतर जया बच्चन यांनी संसदेत त्यांना प्रत्युत्तर दिले. जया बच्चन यांच्या या भूमिकेचे सामनातून समर्थन करण्यात आले आहे.

सामना अग्रलेख:

सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे.

हॉलीवूडच्या बरोबरीने तुमच्या बॉलीवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्या आहेत. सिनेसृष्टीच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून

सिनेसृष्टीला जाग आणली. त्यातून किती कलावंतांना कंठ फुटतो ते पाहू. हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. ”ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.” श्रीमती जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱया लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.

श्रीमती बच्चन या सत्य आणि परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपली राजकीय, सामाजिक मते कधीच लपवून ठेवलेली नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत त्यांनी संसदेत अत्यंत भावुक होऊन आवाज उठवला आहे. सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे.

पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी श्रीमती बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.

‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!