पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी म्हणून राज्यासह देशाच्या पटलावर ठसा उमटवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात सद्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोज सुमारे आठशे ते हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असताना देखील गेले पाच महिने शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कचरावेचक कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा संकलन करणा-या अँन्टोनी एस.आर.एल. कंपनीच्या कंत्राटी कामगरांनी काल (दिनांक १४ सप्टेंबर) रोजी पगार न झाल्यामुळे संप केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी त्याठिकाणी धाव घेऊन कामगरांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या विनंतीवरुन या कर्मचा-यांनी काम सुरु केले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व त्या कंपनीच्या वरीष्ठाशी संपर्क साधून या कामगाराचे वेतन त्वरीत देण्याबाबत आदेश दिले.
महिन्याची १४ तारीख आली तरी या कष्टक-या कामगारांचा पगार अजून का केला नाही तसेच यास जबाबदार कोण? असा जाब देखील विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी विचारला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलनाचे काम जीव धोक्यात घालून करीत असताना या कर्मचा-यांचा पगार न झाल्यामुळे एक दिवसात वेतन देण्याबाबत बजावले. एक दिवासात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. येथून पुढे वेळेवर वेतन देण्याबाबत त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिका-यांना सुनावले असून राजू मिसाळ यांनी या कामगारांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या :
- कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर हटवा- निलेश लंके
- आदिवासी भागातील विद्यापीठाचे मॉडेल आवडले उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना… नक्की वाचा काय आहे हे मॉडेल!
- पुण्यात मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना बजावली नोटीस
- मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!
- मोदी सरकारला लकवा झाला आहे, निर्यातबंदी तात्काळ उठवावी; बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर निशाणा


