मुंबई : राज्यात ऐन दिवाळीत सणामध्ये अहमदनगरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात आग दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया देताना दोन्ही सराकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा असा प्रश्न राउत यांनी दोन्ही सरकारला केला आहे’, असं राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेवर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
सर्वज्ञानी, अहमदनगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडत आहेत. व्हेंटिलेटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चालली आहे. आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाही. या उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय उदय शेट्टी आणि मजनूमध्ये त्यांचा घुंगरु सेठ झाला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय…
आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
दरम्यान, नगरमध्ये आगीच्या दुर्घटनेचं निमित्त शॉकसर्किट असलं तरीही आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ थांबायला हवी. अर्थातच सार्वजिनक आरोग्य व्यवस्था ही राज्य आणि केंद्र सरकार या दोघांची जबाबदारी आहे. सध्या मरणं सोपं झालंय, पण इतकं अमानुष आणि क्रूर असावं?, असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्यावरुनच चित्रा वाघ यांनी राऊतांचा घुंगरु सेठ झाल्याचं म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’
- नगर दुर्घटनेप्रकरणी सीएस डॉ. सुनील पोखरणासह सहा जण निलंबित
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल


