🕒 1 min read
मुंबई : राज्यातील महाआघाडी सरकारच्या 2 वर्षपूर्तीच्या निमित्ताने विरोधकांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपचे नेते पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकराने केलेल्या कामांबाबत टीका करत आहेत. दरम्यान आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
2 नंबरी सरकारची 2 वर्ष… आघाडी सरकारची ही काळी कमाई! असा काव्यात्मक शब्दांत गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. 2 वर्षात आघाडी सरकारमधील नेत्यांनी घोटाळे केल्याचे आरोप करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे घेत सरकारच्या 2 वर्षांतील घोटाळे, आरोपांचा पाढा वाचत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.
2 नंबरी सरकारची 2 वर्षं, देशमुखांना वसूलीची घाई, परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, 2 नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई!, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
2 नंबरी सरकारची 2 वर्षं
देशमुखांना वसूलीची घाई
परबांची मुजोरशाहीमुश्रीफांना टेंडरची मलाई
नवाब मलिक दाऊद का ‘भाई’निलेश लंकेची गुंडाई
महेबूब शेखची झुंडशाहीसंजय राठोडांची लफंगाई
राऊतांची नुसती कोल्हेकुईमुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई
2 नंबरी #MVA सरकारची
ही काळी कमाई !— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 30, 2021
महत्त्वाच्या बातम्या:
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल
- ‘ओमिक्रॉन’ची पुण्यात धास्ती; शिथील झालेले नियम पुन्हा कठोर
- ‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’
- मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला… – बच्चू कडू
- मुंबईतील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
