Share

“छत्रपती शिवाजी महाराजांचा” एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरने थांबवले, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सध्या सतत चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा कराटे’ ही भूमिका साकारली आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे त्याआधी ‘पावनखिंड’ चित्रपटात तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिकांबाबत एका मुलाखतीत अनेक त्याला प्रश्न विचारण्यात आले.परंतु चिन्मयच्या मुलखतीतील एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

चिन्मय मांडलेकरने नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयचा परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले. त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खूप व्हायरल होत आहे.

चिन्मयनं या मुलाखतीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे , ‘कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ अनेकांनी या पोस्टवर लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओही आवडल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे. ‘यासाठी तुझा खूप अभिमान वाटतो’ असंही अनेक युजर्सनी चिन्मयला म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!