Share

चिनी वस्तूंची होळी करत ‘रिपाइं’कडून चीनचा निषेध; चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

Published On: 

पुणे : मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी चिनी वस्तूंसह ध्वजाची होळी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘रिपाइं’ने चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच जगभर पसरलेल्या कोरोना महामारीला चीन जबाबदार असल्याच्या कथित पार्श्वभूमीवरही हे होळी आंदोलन करीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ‘रिपाइं’ने केले. यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

चंद्रकांत पाटलांचे ‘चंपा’ म्हणून बारसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने केले

‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसारपक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कोथरूडमधील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून हे आंदोलन झाले. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी केशव पवळे, बाबासाहेब तुरूंकमारे, जितेश दामोदरे, रेखाताई चव्हाण, उज्जवलाताई सर्वगोड,दस्तगीर शेख,ऍड आनंद कांबळे, शिवाजीराव कांबळे,दीपक सगरे, वसंत ओव्हाळ, प्रमोद दिवाकर, वसंतराव वाघमारे, सुभाष पासोटे, रमेश सोनवणे, सत्येश हिरवे, नवनाथ सोनवणे, अंकुश भोसले, संदीप पौळे, अर्जुन गव्हाणे आदी उपस्थित होते.

‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घालूया, शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया’, ‘दळभद्र्या चिनी वस्तूंचा धिक्कार असो, चिनी वस्तू वापरणार नाही’, ‘आम्ही चिनी वस्तू चिनी ऍप वापरणार नाही’ अशी शपथ घेत कार्यकर्त्यांनी चीनला धडा शिकवण्याचे आवाहन केंद्र सरकारकडे केले. तसेच चीनच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

भाजपमधील ‘हेच’ लोक फडणवीसांना ‘टरबूज्या’ म्हणायचे, अनिल गोटेंचा दावा

बाळासाहेब जानराव, ऍड मंदार जोशी यांनी ‘चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून यापुढे भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिनी वस्तू वापरू नये किंवा विकू नये, असे आवाहन केले. चीनची आर्थिक कोंडी करून आपल्या भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!