🕒 1 min read
धुळे: पडळकर प्रकरणावरून दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला व फडणवीस यांना काहीही बोलेले चालत का ?’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला होता. याला पुर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत असणारे अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ म्हणतात यांचे तीव्र दु:ख होत असल्याचे गोटे यांनी म्हटलंय. मात्र चंद्रकांत दादांना हे माहित नसावे की, त्यांचे ‘चंपा’ नावाचे बारसे स्वत: गिरीष महाजनांनी केले. महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना अरे त्या ‘चंपा’ ला फोन लाव असे सांगितले, असं गोटेंनी म्हटलं आहे. भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत. असे आपले भोळे भाबडे विचार असल्याचं म्हणत अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
भाजपमधील ‘हेच’ लोक फडणवीसांना ‘टरबूज्या’ म्हणायचे, अनिल गोटेंचा दावा
दरम्यान, भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, आता तर, तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असा टोला अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात लगावला आहे.
वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
पडळकर प्रकरणाच्या आडून धनगर विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उसकावीत आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना ‘भावनेच्या भरात मी बोलून गेलो’ असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा ‘पोटात होत तेच ओठात आले’ असा अर्थ होतो, असं गोटे यांनी म्हंटल आहे.
पाकिस्तानी क्रिकेटरने IPL बद्दल दिली लक्ष्यवेधी प्रतिक्रिया, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
