Share

भाजपमधील ‘हेच’ लोक फडणवीसांना ‘टरबूज्या’ म्हणायचे, अनिल गोटेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

धुळे: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे राजकारण तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला व फडणवीस यांना काहीही बोलेले चालत का ?’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला होता. याला पुर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत असणारे अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

अनिल गोटे यांनी पत्रक प्रसिद्ध करत भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पडळकर प्रकरणाच्या आडून धनगर विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उसकावीत आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना ‘भावनेच्या भरात मी बोलून गेलो’ असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा ‘पोटात होत तेच ओठात आले’ असा अर्थ होतो, असं गोटे यांनी म्हंटल आहे.

सरकारचा मोठा निर्णय, सहकारी बँकांतील सामान्यांच्या ठेवींना सरकारी संरक्षण

दरम्यान. भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, आता तर, तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असा टोला अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात लगावला आहे.

पवारांशी पंगा घेणाऱ्या पडळकरांना चक्क राष्ट्रवादीच्याच नेत्याने बाईकवरुन शहरभर फिरवलं

दरम्यान, पवारांवर टीका केल्याने पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं असल्याचे वृत्त tv9 मराठीने दिले आहे. जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले आहे. एडके एवढ्यावरच थांबले नाहीत तर याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने, आता पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!