🕒 1 min read
भंडारा:- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.
रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील. दुपारी १२ वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती तयार केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आहेत. सहा लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- ..हा तर एमआयएमला बदनाम करण्याचा डाव-खा.इम्तियाज जलील
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड
- अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री; चाकणकरांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
