Share

‘मुख्यमंत्री ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’; ते 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून झोकून काम करतायत’

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना स्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजप नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या टीकेला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज प्रत्युत्तर देण्यात आलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

काय म्हणलंय सामना अग्रलेखात ?

कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे.

मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर ‘फॅमिली डॉक्टरां’शी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले की, ‘आतापासूनच लहान मुलांवर लक्ष द्या. मुलांमध्ये आढळणारे जे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला, डायरिया, दूध न पिणे, भूक न लागणे या लक्षणांकडे खास लक्ष द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. हे एका कुटुंबप्रमुखाचेच लक्षण आहे, अशा शब्दात सामनातुन शिवसेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दाद दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!