🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला ! pic.twitter.com/sPdALKDlzS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2019
या ट्विटद्वारे फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिला, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आपल्या एका वाक्याने प्रेरीत करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती, असे म्हणाले.
तसेच बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते, छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची, आपल्या एका वाक्याने प्रेरीत करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती, असे ट्विट यांनी केलं आहे.
दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून बाळासाहेबांकडे पाहता येईल, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195907843490074624?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195903469518934016?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
