अयोध्या : मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेंतर्गत दिल्लीकरांना मोफत अयोध्या दर्शन घडवण्यात येईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. केजरीवाल अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिर आणि राम जन्मभूमी स्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची माहिती दिली.
Now Ayodhya has also been included in Delhi Govt's Tirth Yatra Yojana; to be free of cost for the aged people. They can also bring a member/kin along: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/TuOmPkgMLw
— ANI (@ANI) October 27, 2021
या योजनेंतर्गत आम्ही दिल्लीतील लोकांना वैष्णोदेवी, रामेश्वरम, द्वारकापुरी, हरिद्वार, ऋषीकेश, मथुरा आणि वृदांवनसह विविध तीर्थस्थळांची मोफत यात्रा घडवतो. या योजनेत आता अयोध्येचाही समावेश करण्यात आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेंतर्गत भाविकांचा प्रवास वातानुकूलित रेल्वे गाड्यांमधून होतो. याशिवाय वातानकलित हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते.
या यात्रेचा सर्व खर्च दिल्ली सरकार करते. राम मंदिराच्या उभारणीसाठी तुम्ही देणगी दिली का, असा प्रश्न पत्रकारांनी केजरीवाल यांना विचारला. यावर त्यांनी आपण देणगी दिली असली तरी दान नेहमी गोपनीय ठेवले पाहिजे, असे उत्तर दिले. मी रामाकडे प्रार्थना केली की, देशवासीयांना सुखी-समाधानी आयुष्य लाभूदे, कोरोना महामारी अंत होऊदे आणि येत्या काळात देशात खऱ्या अर्थाने विकास घडूदे. रामाच्या चरणी नतमस्तक होण्याचे नशीब लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी प्रार्थना करतो की, सर्वांना ही संधी मिळूदे, असे केजरीवाल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारच जबाबदार’, संभाजी पाटील निलंगेकरांची टीका
- सुझानने अर्सलनच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली ‘माझे सर्वकाही’ …

