Share

‘मुख्यमंत्री अत्त्याचारी मंत्र्याला पाठीशी घालायचं काम करत आहेत’

Published On: 

मुंबई : संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय. अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘आजवर मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं वाटत होतं. पण याच बलात्कारी मंत्र्याला पाठीशी घालायचं काम ते करत आहेत’, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे. बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. संजय राठोड या बलात्कारी आणि हत्याऱ्याला बाहेर हाकला, असं मुख्यमंत्र्यांना हात जोडून आव्हान आहे’, असंही चित्रा वाघ यांनी म्हंटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!