Share

मोदी सरकार कंडोमसाठी देखील आधार मागेल-पी. चिदंबरम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: पुढील काही दिवसात मोदी सरकार कंडोम व सिनेमा तिकीटावर देखील आधार कार्ड सक्ती करेल अश्या शब्दात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. चिदंबरम आज आयआयटी मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलत होते. आधारच्या अवाजवी सक्तीला विरोध करायला हवा, असे ते म्हणाले.

त्यांनी मोदी सरकारवर नोटाबंदी आणि वस्तू सेवा कर लागू करण्याच्या निर्णयावरूनही ताशेरे ओढले. देशाला कोणताही आर्थिक फायदा जीएसटीमुळे झालेला नाही. नोटाबंदीही फसवीच होती. नोटाबंदीचे सांगितलेले फायदे एक वर्षानंतरही दिसत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

आधारसक्तीला विरोध करण्याची भूमिका चिदंबरम् यांनी मांडल्यावर त्याला इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. नारायणमूर्ती यांनी तात्काळ विरोध केला. सामाजिक संरक्षण व्यक्तीला मिळावे म्हणून आधार कार्डचा वापर केला जात असल्यामुळे त्याला विरोध करणे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले. चिदंबरम् आणि नारायणमूर्ती यांच्यात व्यासपीठावर शाब्दिक जुगलबंदी झाली. अखेर आधारसक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालय जो निर्णय देईल तोच योग्य मानू या, अशी भूमिका चिदंबरम् यांनी मांडल्यावर या वादावर पडदा पडला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!