Share

Chhagan Bhujbal | “नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे विनयभंग होत असेल तर…” ; छगन भुजबळ यांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना जितेंद्र आव्हाड यांना पाठींबा दिला असून सरकारव टीका केली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, “नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे हा विनयभंग होत असेल तर लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो. अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील. आमच्याविरुद्ध देखील चुकीच्या पद्धतीने यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अतिशय चुकीची आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवरच उलटली. तसेच कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये.”

“देशातील लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी न्याय व्यवस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या चांगल्या निणर्यामुळे देशातील नागरिकांचा न्यायालयांवर विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे आजही देशातील नागरिक न्यायाची अपेक्षा ही न्यायालयाकडून करतात,” असे छगन भुजबळ म्हणाले.

माहितीनुसार, भाजप नेत्या रिदा रशीद (BJP leader Rida Rashid) यांनी मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे रिदा या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षाही आहेत.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाणे न्यायालयात हजेरी लावली. जामीन प्रक्रियेची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आव्हाड न्यायालयात हजर होते. न्यायालयाने आव्हाड यांना अटी शर्तींवर जामीन दिला आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यासाठी आणि जामीनदाराला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आव्हाड ठाणे न्यायालयात आले होते. यावेळी पोलिसांना हवं ते सहकार्य करेल आणि हा गुन्हा सिद्ध करतांना पोलिसांनाच नाकी नऊ येतील, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

यापूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र, या प्रकरणात त्यांना नंतर जामीन मंजूर करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!