Share

Naresh Mhaske | “वारसा हा फक्त घराण्याचा नसतो, तर…”; राऊतांच्या ‘त्या’ टीकेला शिंदे गटाचं सडेतोड प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Naresh Mhaske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारपासून अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत. या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंना खोचक सल्ला दिला. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा”, असं संजय राऊत म्हणाले. यावर आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगावे, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं”, असं प्रत्त्युत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊत यांना दिले आहे.

“सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कोणी दिली?”, असा सवालही नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्र, देशात नेत आहोत. त्यामुळे खरा अधिकार फक्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील शिलेदारांचा आहे. वसा, वारसा हा फक्त घराण्याचा नसतो, तर तो विचारांचा, तत्वाचादेखील असतो,” असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणालेत संजय राऊत?

“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!