Share

MNS | राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंवर मनसेचा पलटवार! जुना व्हिडीओ केला व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

MNS | मुंबई : सुषमा अंधारे यांची प्रबोधनयात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघात पोहोचली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजप (BJP) पक्षावर जोरदार घणाघात केला आहे. यालाच मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर देत सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

८०-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग आहे,हात थरथर करायला लागले आहेत,असं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विधान करणं याला उर्मटपणा म्हणतात, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच, महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या लावरे तो व्हिडिओला उर्मटपणा म्हणण्या अगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा, असा घणाघात गजानन काळे यांनी केला आहे.

15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुसंस्कृतपणा आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच अंधारे यांनी पहिल्यांदाच मनसेवर टीकास्त्र सोडले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!