Share

‘बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी मनात आलं तर समोर येतं सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कधी काळी बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेले छगन भुजबळ यांनी स्वर्गीय बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली आपल्या कणखर भाषा, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, सामना या पत्रिकेचे संस्थापक,संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्या पुढे येतं. अस भुजबळ म्हणाले आहेत. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ! अशा शब्दांत भुजबळ यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मरण करुन अभिवादन केले आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे होणार आहे.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड 19 मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!