नांदेड : येत्या आठ दिवसात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहिर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान खासदार चिखलीकर आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान पुन्हा समोरासमोर आले आहेत. निवडणुकीपुर्वी जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये बँकेच्या मतदार यादीवरून वादाची ठिणगी पडली आहे.
८ फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेने अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली आहे. जाहीर यादीनुसार ९४० मतदारांचे नाव यादीत आहे. या यादीत जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावावरील आक्षेप लातूरच्या विभागीय सहनिबंधकांनी मान्य केला होता. यामुळे चिखलीकर हे निवडणुकीतुन बाहेर झाले होते. पण या निर्णयाला चिखलीकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपीठाने विभागीय सहनिबंधकांना याबाबतचे अधिकारच नसल्याचे सांगत चिखलीकरांच्या नावावरील आक्षेप फेटाळला.
त्यामुळे पुन्हा खा.चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात परतल्याचे स्पष्ष्ट झाले. मागील निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आणि अशोक चव्हाण यांना बँकेपासून दूर ठेवले. आणि जिल्हा बँकेवर सत्ता काबीज केली होती. पण आता राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले असून सेनेसह राष्ष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे बदललेली परिस्थिती जिल्हा बँकेचे आता असलेले चित्र बदलण्यासाठी कितपत उपयोगी ठरेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

