Share

चार धाम यात्रा झाली रद्द, उत्तराखंड राज्य सरकारचा निर्णय

Published On: 

डेहराडून : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड राज्य सरकारने चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी मंदिरांची कपाट त्यांच्या निश्चित वेळेतच उघडली जाणार आहेत. त्यानुसार मे महिन्यात गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि ब्रदीनाथ इथले कपाट उघडले जातील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संबंधी माहिती दिली.

चारधाम यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री रावत यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यात जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले केदारनाथ धामचाही समावेश आहे. केदारनाथ धामचे कपाट १७ मे रोजी उघडणार आहे. मात्र, यंदा भक्तांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केदारनाथसह चार धाम अशी ओळख असलेल्या मंदिरांचे कपाट दरवर्षी ऑक्टोंबर–नोव्हेंबरमध्ये बंद केली जातात. तर एप्रिल–मे दरम्यान उघडली जातात.

https://twitter.com/TIRATHSRAWAT/status/1387695698661969923

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोलश मीडियावर म्हटले की, ‘भक्तांच्या सुरक्षेसाठी चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांची सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राज्य सरकारच्या वतीने कोव्हीड-१९ च्या लढाईमध्ये शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!