🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजप संसदीय कमिटीची बैठक रविवारी रात्रीपर्यंत दिल्लीमध्ये सुरू होती. बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करतानाच भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील विद्यमान तीन आमदारांना भाजपने नारळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातून लढणार आहेत.
चंद्रकांत पाटील हे पुण्यातून लढणार असल्याने त्यांच्यासाठी कोथरूड हा मतदारसंघ निवडला असल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता कुलकर्णी यांना राज्यातील इतर ठिकाणी उमेदवारी मिळते की त्यांना इतर कुठली मोठी जबाबदारी देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याच बरोबर त्यांना विधानपरिषदेवर सुद्ध पाठवले जाऊ शकते.
पुणे शहरातील इतर जागांवर गिरीश बापट हे लोकसभेवर गेल्याने त्यांच्या जागी विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच शिवाजीनगर मतदारसंघात मागील पाच वर्षात सुमार कामगिरी राहिलेले विजय काळे यांच्याऐवजी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरात भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
दरम्यान पुणे छावणी मतदारसंघात माजी मंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी नाकारत त्यांचे भाऊ सुनील कांबळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर भाजपने हडपसरमधून योगेश टिळेकर तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना पुन्हा संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178538296072228864?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178537961823989760?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178531020519268352?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
