🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ रोखठोकमधून भाजपवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ‘विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करून ठेवली आहे. तसेच राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे’, असे म्हणत राऊतांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
‘करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे’ असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे राऊतांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील टोलेबाजी केली. ते म्हणजे की,’सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा केली आहे. किरीट सोमय्या रोज सकाळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करतात. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे’, असे म्हणत राऊतांनी मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, गोपीनाथ मुंडे यांची उदाहरणं दिली. ‘आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते’ असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत संघर्ष अटळ ? मुंबईत काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढण्यावर ठाम !
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
