Share

चंद्रकांतदादा माफी मागा नाहीतर….; संजय राऊतांनी पाठवली नोटीस

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक लढाई संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवलीय. माझ्या बदनामीबाबत माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला होता. त्यावरुन आता संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना नोटीस पाठवली आहे. त्यावर आता चंद्रकांत पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!