Share

‘चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो’

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. मागील निवडणुकीत तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता यातील काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, भाजपचा कोणताही सदस्य नाराज नाही. प्रत्येक पक्षात नाराजी असते. त्यामुळे 19 नगरसेवक फुटतील असं शक्य नाही. निवडणुका समोर आल्या की अशा चर्चा समोर येत असतात. आमच्या विरोधी पक्षाने अशा चर्चा केल्या असतील, असे मत भाजप खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो, असं माजी खासदार संजय काकडे म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांना 100% निवडून आणू. त्यांचा प्रचारप्रमुख पण मी होईन. कोथरूडमध्ये पण प्रचाराची माझ्याकडेच जबाबदारी होती, हेसुद्धा संजय काकडेंनी अधोरेखित केलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!