🕒 1 min read
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप देखील रंगल्याच पाहायला मिळतंय. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना टीका केली आहे.
अजित पवारांच्या वाक्यात दांभिकपणा आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केस नीट चालवली नाही, असं मराठा समाज म्हणत आहे. सरकारने सारख्या तारखा मागितल्या. त्यामुळे कायद्याला स्टे आला. आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असं आम्ही सांगत आहोत. पण सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. आता आयोग नेमलाय. त्याला स्टाफ आणि बळ पुरवा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी उभे राहू; संभाजीराजे तर आमचे राजे आहेत’
- ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल – उद्धव ठाकरे

