🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला हाणलाय. चंद्रकांत दादांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा, असा सल्लाच वडेट्टीवार यांनी पाटलांना दिलीय.
विजय वडेट्टीवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले. राज्यावर कोरोनाचं संकट असतानाही आम्ही फक्त बोलघेवडेपणा न करता शांतपणे काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेमुळंच हा विजय मिळाल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. भाजप ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम करत होता. आम्ही ओबीसींसाठी चांगलं काम करत आहोत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
-
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
-
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
-
‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- ‘हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रू काढणे फक्त पवारच सांगू शकतात’, भाजपचा ठाकरे सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
