Share

चंद्रकांत पाटलांना धक्का ! कोथरूड मधून निवडणूक लढवण्यास ब्राह्मण महासंघाचा विरोध

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- भाजप संसदीय कमिटीची बैठक रविवारी रात्रीपर्यंत दिल्लीमध्ये सुरू होती. बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करतानाच भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील विद्यमान तीन आमदारांना भाजपने नारळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील हे पुण्यातून लढणार असल्याने त्यांच्यासाठी कोथरूड हा मतदारसंघ निवडला असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा सुरू होताच चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे.

आनंद दवे यांनी म्हटले आहे की, पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपच्या बरोबर राहिला आहे. असं असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार, असे म्हणत आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवर टीका केली आहे.

तसेच जातीचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारसुद्धा उभे करू,’ अशी आक्रमक भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्याआधीच चंद्रकांत पाटील हे अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील हे पुण्यातून लढणार असल्याने त्यांच्यासाठी कोथरूड हा मतदारसंघ निवडला असल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता कुलकर्णी यांना राज्यातील इतर ठिकाणी उमेदवारी मिळते की त्यांना इतर कुठली मोठी जबाबदारी देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178574925931540480?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178578854987714560?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!