Share

दुष्काळ निकषांच्या बदलांसाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार- चंद्रकांत पाटील

Published On: 

नागपूर : केंद्र शासनाने दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील. मुक्ताईनगर, बोधवड व अंमळनेर तालुक्यातील गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्यास जुन्या निकषाप्रमाणे राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत आ. एकनाथ खडसे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ज्या गावांची पैसेवारी 50 च्या आत आहे त्यांना दुष्काळ सदृश परिस्थिती असताना जी मदत केली जाते ती मदत केली जाईल.

केंद्र शासनाने दुष्काळाबाबत मार्गदर्शक सूचना बदलल्याने त्यात बदल करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!