🕒 1 min read
औरंगाबाद:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. या पराभवानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा सत्तास्थापनेची स्वप्नं पाहू नयेत. त्यांचं स्वप्न खरं होणार आहे. पण ते ३२ तारखेला, आणि ३२ तारीख येणार असेल तर त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, अशी खोचक टिप्पणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम राहणार : जयंत पाटील
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस

