🕒 1 min read
मुंबई: सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिला. दरम्यान यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अजित पवारांना नेहमीच वाटते की, माझा परखडपणा किती मोठा आहे पण अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ट नीट सांगायची असते. समजा तुम्हाला असे वाटते की, विलीनीकरण शक्य नाही, तर का शक्य नाही? तुम्ही जर जीवन प्राधिकरणाचे विलीनीकरण केले, तर एसटीचे का करणार नाही? त्यातून तुम्हाला समजा टेक्निकल अडचण वाटत असेल की, एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी करणार का? अडचण काय तुमची, मला हे कळत नाही की, शेवटी राज्याची तिजोरी आहे कशासाठी? दरम्यान २३ लाख कोटी राज्याचे सकाळ उत्पन्न झाले. यापैकी २५ टक्के म्हणजेच ६ लाख कोटी राज्याला कर्ज घेता येते. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मूनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवल्यामुळे १५ कोटीच्या वर राज्याला कर्ज घेता आले नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 25, 2021
दरम्यान विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय अंतिम निकाल देईलच, पण सरकारने बहुतांशी मागण्या पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. अन्यथा गिरणी कामगार जसे देशोधडीला लागले तशी वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एसटी मंडळाने कारभार सुधारावा आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, तसेच भाडेवाढीच्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना अजित पवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,’ओळखा पाहू कोण?’
- भाजपचा शिवद्रोह उघडा पडत आहे-रुपाली पाटील ठोंबरे
- मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत; भाजप नेत्याचा प्रताप
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
