Share

बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करा

Published On: 

औरंगाबाद : भाजपतर्फे मेनॉर हॉटेलच्या लॉनवर शनिवारी (ता. २९) पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लबोल केला. यावेळी बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन चंद्रांत पाटील यांनी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेची मागील ३० वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. या काळात शिवसनेने केलेले एक काम दाखवा. शहरात कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. जनतेला जे हवे ते शिवसेनेने उभारले नाही. त्यामुळे आम्हाला महापालिकेतील एकहाती सत्ता द्या, आम्ही मोफत शौचालय व्यवस्था, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी मोफत बससेवा, हॉस्पिटल सेवा देऊ, अशा घोषणाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

ते पुढे म्हणाले, ‘ शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली आहे. आता घटनेत नसताना मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. अशी ही शिवसेना शहरातील जनतेला सुरक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना हद्दपार करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!