🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर वक्तव्य केले होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. माझ्यामते बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता वाढेल, अशाच पद्धतीने चरित्र लिहलं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही पर्याय द्या”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे आयोजितशिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२ आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटलांचा पलटवार-
चंद्रकांत पाटील म्हणाले, “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे. त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केलं ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याच्यापासून लोकांना विचलित करतात. तुम्ही पर्याय द्या जे आहे ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते खरं असेल त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील”
काय म्हणाले होते शरद पवार ?
“शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. रामदासांचे, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय आहे? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त माँ जिजाऊ होत्या. त्याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या. मात्र खऱ्या गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही”, असे शरद पवार म्हणाले होते.
पुढे ते असेही म्हणाले होते, “छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली. हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केले. मात्र त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता, कुलभूषण किंवा कुळवाडी, असा केला.”
महत्वाच्या बातम्या :
- Ayman Al-Zawahiri | अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या गुप्त ऑपरेशनमध्ये ठार
- Bhagat Singh Koshyari | अखेर राज्यपालांचा माफीनामा! म्हणाले होते, मुंबईतून राजस्थानी-गुजराती गेल्यास काय उरणार?
- Eknath Shinde and Aditya Thackeray | एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज पुण्यात आमने-सामने येणार?
- Sanjay Raut | राऊतांच्या घरी सापडलेल्या पैश्यांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव, मुख्यमंत्री म्हणतात…
- Jitendra Awhad । राजभवनाकडे निघाला होता मोर्चा, जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
