Share

आम्ही तयार, भाजपने लवकर निर्णय घ्यावा : चंद्रकांत खैरे

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे 1995 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. यावेळीही मराठवाड्यातून अधिकाधिक आमदार निवडून देऊ. मग युती असो किंवा नसो. शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेच्या मराठवाडा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खैरे पुढे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीचा पराभव विसरून शिवसेना पुढे वाटचाल करीत आहे. उमेदवारीबाबत कधी कोणाच्या नावाची चर्चा होईल, याचा नेम नाही, त्यामुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये. उमेदवारी मागण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन येऊ नका. तसेच कोणी गडबड करण्याचा प्रयत्न कला तर त्याचा समाचार घेतला जाईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. त्यासाठी मराठवाड्यातील जास्तीत जास्त जागा जिंकून देऊन बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले.

जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येईल, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे शिरसाट म्हणाले. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर, जयवंत ओक, विकास जैन, राजेंद्र जंजाळ यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक नंदकुमार घोडेले यांनी तर सूत्रसंचालन राजू वैद्य यांनी केले. अंबादास दानवे म्हणाले, की मुंबईची टीम येऊन अभ्यास करत आहे. त्यांचा स्वतंत्र अहवाल पक्षाकडे जाणार आहे. त्यावर उमेदवारीचा निर्णय होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176714693538271232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176714407146975232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176711219434024960?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!